घाटी रुग्णालयात तंबाखु बहाद्दरांचा असाही एक विक्रम...

Foto

औरंगाबाद- संपूर्ण मराठवाड्यातील गरिबांचे रोग निदान करणार्‍या घाटी रुग्णालयात धूम्रपान करणार्‍यांचा वावर सध्या वाढलेला दिसून येत असून घाटी परिसरात असलेल्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच अनधिकृत टपरी चालकांनी घाटी परिसराच्या आवारातच सर्रासपणे गुटखासिगारेटतसेच इतर तंबाखुजन्य वस्तु विकणे सुरू केले आहे. परिणामी घाटी रुग्णालयात येणार्‍या जाणार्‍यांनी तबांखु खाऊन खिडक्यांवर पिचकार्‍या मारल्या आहेत. या मुळे मोठ्या प्रमाणात दुंर्गधी पसरली असून खिडक्यांही रंगुन गेल्या आहेत. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन थुंकणार्‍यांवर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.

 

गोरगरीबांची जिवणवाहीनी म्हणुन ओळख असणार्‍या घाटी रुग्णालयात येथीलच नव्हे तर अहमदनगरनाशिकमराठवाड्यातील रुग्ण उपचारासाठी मोठ्या प्रमाणात येतात. त्यांच्या सोबत नातेवाईकही मोठ्या प्रमाणात असतात. असे असतानारुग्णांना सोबत आणि भेटण्यासाठी आलेले नागरिक रुग्णालयाच्या भिंतीवरखिडक्यावर तंबाखु खाऊन थुंकत आहेत. खिडक्यात मोठ्या प्रमाणात सुपारीतंबाखु साचली आहे. यामुळे दुंर्गधी पसरली आहे. तसेच रुग्णालयातील कोपर्‍या कोपर्‍यातही थुकंलेले पहावयास मिळत आहे. घाटी प्रशासनही याकडे दुर्लक्ष करत आहे. थुकंणार्‍यावर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.